सविता निमडगे यांची वीरशैव शिवा संघटना महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड
हदगाव/प्रभाकर डुरके,दि.11
क्रांतीसुर्य जगत ज्योती बसवेश्वर महाराज यांच्या 893 व्या जयंतीनिमित्त बिलोली शहरांतील आंनद मंगल कार्यालयात गुरुवार आठ जुन रोजी अहमदपूरकर महाराज, तमलुरकर महाराज गुरुवर्याच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न झाले.तर यावेळी वीरशैव शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या मार्गदर्शनातुन पळसा ता.हदगांव येथील सामाजिक कार्यकर्त्या सवीता विनोद निमडगे यांची वीरशैव शिवा संघटना महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.यावेळी उपस्थित गुरुवर्यासह वीरशैव शिवा संघटनेचे संस्थापक प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील विविध भागातील उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी सवीता निमडगे यांच्या निवडीबद्दल समाज बांधवासह विविध क्षेत्रातुन शुभेच्छेचा वर्षाव होत आहे.
यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर , वैजनाथराव तोनसुरे राज्य उपाध्यक्ष शिवा संघटना , विठ्ठलराव ताकबिडे सेवा जनशक्ती पक्ष प्रवक्ते, संजय कोठाळे राज्यसर चिटणीस शिवा कर्मचारी महासंघ, विरभद्र बसापुरे मराठवाडा अध्यक्ष शिवा कर्मचारी महासंघ. संभाजी बुडे जिल्हाध्यक्ष शिवा संघटना दक्षिण नांदेड, अनिलजी शेटकार प्रसिद्ध उद्योजक नांदेड, डॉ. हनुमंत लखमपुरे ,विजय होपळे, महेश पाटील हांडे,त्रिंबक पाटील सावळीकर, सटवाजी पवार जळगावकर,नारायणराव अनेराये बेलदरा,प्रभाकर दहिभाते बरडशेवाळेकर विजय मुंडकर यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर समाज बांधवाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


