pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

संस्कार प्रबोधिनी विद्यालय गुणवंतांचा कौतुक सोहळा, स्पर्धेतून यश मिळवल्यास चिरकाल टिकते-प्राचार्य उदय आनापुरे

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि.12
स्पर्धेतून यश मिळवल्यास ते चिरकाल टिकते कारण
वाढती संख्या बघता आपल्याला स्पर्धा असणारच आहे. आणि मग या स्पर्धेतून मिळवलेले यश चिरकाल टिकते असे प्रतिपादन आयसीटीचे प्राचार्य उदय अनापुरे
यांनी केले.जालन्यातील संस्कार प्रबोधिनी विद्यालयात गुणवंतांचा कौतुक सोहळा आयोजित
करण्यात आला होता. यामध्ये इयत्ता दहावीतील ९० टक्यांहून अधिक गुण घेऊन घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी,सचिव विजय देशमुख,विनायकराव देशपांडे, भास्करराव काळे, प्रा. केशरसिंह बगेरिया
मुख्याध्यापकईश्वर वाघ आदींची उपस्थिती होती.२६ गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्राचार्य उदय अनापुरे पुढे बोलताना म्हणाले स्पर्धेच्या युगात अभ्यास करताना विद्यार्थ्यांची दमछाक होत आहे. असे असताना आपल्याला
प्रयत्न केल्याशिवाय यश मिळणार नाही अडथळा येणारच आहे पण त्यातून मार्ग काढावा लागणार आहे आणि यातून आपोआप यशाचा मार्ग सापडणार आहे.
विद्यार्थ्यांचा खरा आधारस्तंभ शिक्षक आहे असे ते म्हणाले. यावेळी अध्यक्षीय समारोप सुरेश कुलकर्णी यांनी केला.कार्यक्रमास शाळेतील शिक्षक रामदास कुलकर्णी, किरण धुळे, रशीद तडवी,माणिक राठोड,रेखा हिवाळे, शारदा उगले, कीर्ती कागबट्टे, स्वप्नजा खोत
तसेच इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थी पालक आदींची उपस्थिती होती.इयत्ता नववीतील विद्यार्थिनी पूर्वा तळेकर,माधवी पवार, कार्तिकी सावंत,श्रृती खांडेभराड यांनी सूत्रसंचालन केले तर आभार मु.अ.ईश्वर वाघ यांनी
मानले.
———————————————————-
जालन्यातील संस्कार प्रबोधिनी विद्यालयातील इयत्ता दहावीतील ९० टक्यांहून अधिक गुण घेऊन घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव
करतांना आयसीटीचे प्राचार्य उदय अनापुरे, संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी,विनायकराव देशपांडे आदी.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे