pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

कृषी निविष्ठांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.19

सन 2024-25 मध्ये राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकास योजनेअंतर्गत विविध निविष्ठ पुरविण्यात येणार आहेत. यामध्ये नॅनो युरीया सोयाबीन, नॅनो डीएपी सोयाबीन, नॅनो युरिया कापूस, नॅनो डीएपी कापूस यासाठी अर्ज दि.30 जुन 2024 पर्यंत तर मेटाल्डीहाईड सोयाबीनसाठी दि.23 जुन 2024 पर्यंत कालावधी आहे. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी  mahadbt.maharashtr.gov.in farmer login संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

नॅनो युरीया सोयाबीन, नॅनो डीएपी सोयाबीन, नॅनो युरिया कापूस, नॅनो डीएपी कापूस , मेटाल्डीहाईड सोयाबीन या निविष्ठांचा पुरवठा करण्यासाठी लाभार्थ्यांची निवड महाडिबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर दि.12 जुन 2024 पासून सदर बाबीच्या टाईल्स उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. बियाणे, औषधी व खते या टाईल्स अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे