pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

फ्रेंड्स ऑफ नेचरचे पदाधिकारी व पोलिसांनी वाचविले सापांचे जीव.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.20

१९ जून २०२४ रोजी संध्याकाळी उरण मधील पोलीस कर्मचारी खैरावकर यांचा फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) च्या हेल्पलाईन वर कॉल आला , की खोपटा पुलाच्या चौकाच्या पुढे करंजा रोड लगत जाळयात २ साप अडकले आहेत. सेवेवर असणाऱ्या पोलीसांच्या या जाळयात अडकलेल्या सापांवर लक्ष गेलं आणि त्यांनी मदतीसाठी कॉल केला.जर हे जाळयात अडकलेले साप त्यांच्या नजरेत पडले नसते तर ते तडफडून मेले असते. अंधार पडत चालला होता ,पावसाने चांगला जोर धरला होता.कॉलरने लोकेशन शेअर केले होते.ट्रॅफिक आणि पावसामुळे तिथे पोहोचायला उशीर होत होता. लोकेशनवर जाऊन पाहिलं तर फुल साईझ चा धामण साप जाळयात अडकला होता, सुटकेच्या प्रयत्नात थकला होता. फ्रेंड्स ऑफ नेचरच्या पदाधिकारी असलेल्या सर्पमित्रांनी लवकरात लवकर या सापांची सुटका करून पिशवीत भरले व दुसऱ्या सापाचा शोध घेतला.दुसरा धामण साप दिसून येत नव्हता,एका प्लायवूडच्या खाली असल्याकारणाने कोणाच्या नजरेस येत नव्हता.मानेच्या बाजूला जाळ्याचे २ धागे अडकले होते.त्याला जाळेमुक्त करून लवकरात लवकर दोन्ही ही धामण साप सुरक्षित ठिकाणी मुक्त केले.याकामी पोलीस हवालदार, खैरावकर(उरण वाहतूक शाखा), पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड(उरण वाहतूक शाखा), पोलीस नाईक मस्के (उरण पोलीस स्टेशन),पोलीस नाईक मुळे(उरण पोलीस स्टेशन) व स्नेहा जोशी यांचे सहकार्य लाभले.सापाचे प्राण वाचविणाऱ्या केअर ऑफ नेचर या पर्यावरण प्रेमी संघटनेचे पदाधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे