pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

‘गरजेपोटी घरे नियमन’ संदर्भात निलेश पाटील यांनी केले मार्गदर्शन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3

उरण मधील बोकडविरा येथे बोकडविरा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच अपर्णा मनोज पाटील यांच्या पुढाकाराने “गरजेपोटी घरे नियमन”संदर्भात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर व्याख्यानाला नवी मुंबईतील चार्टर्ड अकाऊंटेंट आणि आगरी कोळी यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष आणि गरजेपोटी घरांच्या विषयाचा गाढा अभ्यास असलेले निलेश ज्ञानेश्वर पाटील यांनी मार्गदर्शन केले.यावेळी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी गरजेपोटी घरे निर्माण होण्या मागची कारणे, वेळोवेळी झालेले शासन निर्णय आणि आता २३ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या शासन निर्णया साठी पुढे अर्ज करण्याची आणि त्या अंतर्गत भाडेपट्ट्याने जमीन नावावर करण्याचे सुचवले गेले, ज्याला प्रश्न उत्तर तासा नंतर उपस्थित सर्वांनी समर्थन केले. सोबत बोकडविरा गावात आज ही ग्रामपंचायत असल्याने महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड आणि ग्रामपंचायत अधिनियम ह्यांच्या साहाय्याने सदर भाडेपट्टा नंतर सनद स्वरुपात कसे आणता येईल ह्याची ही कायदेशीर माहिती त्यांना देऊन भाडेपट्ट्याचे मालकी हक्कात रुपांतरित करण्याची ट्रिक ही यावेळी निलेश पाटील यांच्याकडून सांगण्यात आली.

शिबिराच्या शेवटी प्रश्न उत्तर तासात अनेकांनी आपल्या शंकांचे निरसन करुन घेतले आणि जवळपास अडीच तास सुरु असलेल्या ह्या शिबिराचे उपस्थित सर्वांनी समर्थन आणि कौतुक केले.

सदर व्याख्यान शिबिराचे आयोजन बोकडविरा ग्रामपंचायत ह्यांच्या माध्यमातून आणि सरपंच अपर्णा मनोज पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.प्रसंगी उपसरपंच धृव जयवंत पाटील व ग्रामपंचायतचे सदस्या रुपाली पाटील, स्मिता पाटील, गीता पाटील, शोभा पाटील , कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील,माजी सरपंच भगवान पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत पाटील, गजानन पाटील, शांताराम कडू,नवी मुंबईतून ऍड.संकल्प निरंत पाटील तसेच कोपरचे राज पाटील उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे