pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

अपघातग्रस्त केशव ठाकूर कुटुंब नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत.

१ वर्षे उलटूनही न्याय न मिळाल्याने एनएमएमटी प्रशासनाविरोधात तीव्र संताप. आमसभेत प्रश्न उपस्थित केल्याने न्याय मिळण्याची आशा.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3

८ फेब्रुवारी २०२४ रोजी उरण खोपटे येथे एनएमएमटी बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या भीषण अपघातात निलेश शशिकांत म्हात्रे याचा निष्पाप प्राण गेला. व त्याच वेळी केशव आत्माराम ठाकूर हे गंभीर रित्या जखमी झाले. त्यानंतर नवी मुंबई महानगर परिवहन मंडळ (एनएमएमटी )यांनी २० दिवसाच्या आत मयत व जखमी कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचे हमीपत्र लिहून दिले होते. त्यानंतर सतत पाठपुरावा, संघर्ष,आंदोलने केली. त्यात निलेश शशिकांत म्हात्रे यास एक वर्षानंतर न्याय मिळाला. परंतु त्याच्या बरोबर संघर्ष करणाऱ्या गंभीररित्या जखमी झालेल्या झालेल्या केशव आत्माराम ठाकूर यास अजूनही कोणतेही नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. तरी त्याला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, त्याची संपूर्ण नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी २८ फेब्रुवारी २०२५ रोजी जेएनपीटी मल्टीपर्पज सभागृह उरण येथे झालेल्या आमसभेत उरण मधील महिला सामाजिक कार्यकर्त्या ममता पाटील यांनी केली होती. या सभेस आमदार महेश बालदी तसेच विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. केशव आत्माराम ठाकूर यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी जनतेचेही इच्छा आहे. मागणी आहे. मात्र एक वर्षे उलटून गेला तरी एनएमएमटी प्रशासन या गरीब कुटुंबाला न्याय देण्यास टाळाटाळ करीत असल्याने ठाकूर कुटुंबियांनी व जनतेने एनएमएमटी प्रशासन विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.आमसभेत झालेल्या प्रश्नोत्तरात अपघातग्रस्त व न्याया पासून वंचित असलेले केशव ठाकूर यांचाही प्रश्न उपस्थित झाल्याने हा प्रश्न लवकरच सुटेल अशी आशा केशव ठाकूर यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे