pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 20

शासनाकडून कौटुंबिक हिसाचारापासून महिलांच्या संरक्षणासाठी अधिनियम 2005 कायदा तयार करण्यात आला आहे. या कायद्यातंर्गत आपल्या कार्यक्षेत्रातील न्यायदंडाधिकारी यांच्याकडे आपण संरक्षण अधिकारी यांच्यामार्फत अर्ज करू शकता.
या कायद्यात तुमच्या किंवा तुमच्या मुलांविरूध्द होणारे कौटूंबिक अत्याचार तुम्ही थांबवू शकता. प्रतिवादी कडून तुमचे स्त्रिधन, दाग दागीने, कपडे, कागदपत्रे इत्यादी हस्तगत करू शकता. तुम्ही ज्या सहभागी घरात राहत होता त्या घरात राहण्याचा आपला हक्क आहे. तुमचे सहभागी घर हस्तांतरीत करण्यास किंवा विकण्यास पायबंद घालु शकता. प्रतिवादीकडून आपल्याला आणि आपल्या मुलांना उपजिवीकेसाठी अर्थ सहाय्य मिळवू शकता. मोफत कायदे विषयक सल्ला केंद्र, सेवा पुरविणाऱ्या संस्था, वैद्यकिय सुविधा, निवारगृह, आवश्यक त्या सेवा सुविधा प्राप्त करून घेवु शकता.

सदर कायद्यान्वये खालील प्रमाणे आदेश मिळवू शकता
कलम 17- सहभागीत घरामध्ये राहण्याचा हक्क मागु शकता. कलम 18- कोणत्या प्रकारचा हिंसाचार होऊ नये यासाठी संरक्षण आदेश. कलम 19- निवासासाठीचा आदेश मिळवू शकता. कलम 20- उपजिवीकेसाठी अर्थसहाय्याचा आदेश मिळवू शकता. कलम 21- यामध्ये आपली अज्ञानपालक मुलांचा ताबा मिळवू शकता. कलम 22- हिंसाचारामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई मागू शकता. अधिक संपर्कासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, तळ मजला जालना येथे किंवा एस. जी. कुलकर्णी 9011778743 यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे