pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग संघर्ष समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवन व नगरपालिका प्रशासन संचालनालय कार्यालय येथे लाक्षणिक उपोषण.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.10

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग संघर्ष समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवन व नगरपालिका प्रशासन संचालनालय कार्यालय येथे लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले.नगरपरिषद नगरपंचायत मधील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे ज्या मागण्यांपैकी मुख्य मागण्या मा. मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या समवेत राज्याचे मुख्य सचिव, वीत्त विभाग सचिव, सामाजिक न्याय विभागाचे सचिव आणि नगरविकास विभागाचे सचिव यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी १ वर्षे आणि ३ महिने होऊनही झालेली नाही याकडे प्रामुख्याने लक्ष वेधणेकरिता कोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालयावर व नगरपालिका प्रशासनालय कार्यालय येथे नगरपरिषद आणि नगरपंचायत संवर्ग संघर्ष समितीचे निमंत्रक व म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अँड सुरेश ठाकूर, संघर्ष समितीचे नेते व म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार, संघर्ष समितीचे नेते व म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस अनिल जाधव याच्या नेतृत्वाखाली करण्यात आले व त्यानंतरच झालेल्या सभेत पुढिल आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली.तसेच येत्या २० जुलै २०२४ रोजी पनवेल महानगर पालिकेतील कामगारासह कोकण विभागीय भव्य मेळावा पनवेल येथे घेण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली. या प्रसंगी कामगारांना मार्गदर्शन करण्यात आले.आंदोलनाप्रसंगी कोकणातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, राकेश पाटिल, भूषण काबाडी, अजिंक्य हुलवणे, शैलश गायकवाड,अंनत पाटिल, दत्तगुरू म्हात्रे,रविंद्र आयनोडकर, सतोष कुडेकर, नरेद्र नांदगावकर, मनोज पुलेकर,आलिम मुल्ला, चव्हाण सचिन रसालकर , राहूल गायकवाड, हरेश जाधव मधुकर भोईर , रमेश कांबळे, सिताराम दादा म्हसकर,श्रीमती संगीता सोलंकी, दत्तात्रय डोहले , माधव सिद्धेश्वरे, राजेश सोलंकी, जितेंद्र पाडावे इत्यादी कोकण विभागातील नगरपरिषद नगरपंचायत कामगार नेते व प्रतिनिधी , भगिनी मोठया प्रमाणात सहभागी झाले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे