pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे 18 व 19 जुलै रोजी आयोजन  खेळाडुंना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.11

जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा 2024-25 चे आयोजन दि. 18 ते 19 जुलै 2024 या कालावधीत  रेल्वे फुटबॉल मैदान येथे करण्यात आले आहे.
वयोगट 17 वर्ष आतील मुलांची स्पर्धा  18 जुलै तर 15 वर्ष आतील मुले आणि 17 वर्ष आतील मुलींची स्पर्धा 19 जुलैला होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडुंसाठी जन्म तारखेनुसार वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे. वयोगट – 15 वर्षाआतील मुले (सब न्युनिअर) जन्मतारीख- दि. 1 जानेवार 2010 किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. तर 17 वर्षाआतील मुले व मुली (ज्युनिअर) जन्मतारीख – 1 जानेवारी 2008 किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.
सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूकडे जन्म दाखला /आधार कार्ड/ पासपोर्ट (मुळ प्रतीत) असणे आवश्यक आहे. जिल्हास्तर स्पर्धेची प्रवेशिका सादर करण्याची शेवटची तारीख दि. 15 जुलै 2024 पर्यंत ऑनलाईन www.jalnadso.com या वेबसाईटवर व ऑफलाईन पध्दतीने प्रत्यक्ष जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथे जमा करावे.
63 वी आंतरराष्ट्रीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धा माहे सप्टेंबर 2024 मध्ये होणार आहे. त्यासाठी विविध स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हास्तर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धा 2024-25 मध्ये जिल्हयातील जास्तीत जास्त शाळांनी / खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी आरती चिल्लारे मो.7758863991 यांच्याशी संपर्क साधावा. असे क्रीडा विभागाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे