जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेंच्या नियोजित तारखेत बदल
जालना/प्रतिनिधी,दि.16
शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जालना जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन दि. 18 ते 19 जुलै 2024 या कालावधीत करण्यात आले होते. तांत्रिक कारणास्तव तारखेत बदल करण्यात आला असून जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेंचे आयोजन आता 17 वर्षाखालील मुले दि. 19 जुलै 2024 रोजी व 15 वर्षाखालील मुले आणि 17 वर्षाखालील मुलींसाठी दि. 20 जुलै 2024 रोजी जालना येथील रेल्वे फुटबॉल मैदानावर आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी जन्म तारखेनुसार वयोमर्यादा 15 वर्षाआतील मुले (सब ज्युनिअर) साठी दि. 1 जानेवारी 2010 किंवा त्यानंतर जन्म़लेला असावा व 17 वर्षाआतील मुले व मुली (ज्युनिअर) या गटासाठी दि. 1 जानेवारी 2008 किंवा त्यानंतर जन्म़लेला असावा. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूकडे जन्म दाखला, आधार कार्ड, पासपोर्ट (मुळ प्रतीत) असणे आवश्यक आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेची प्रवेशिका सादर करण्याची शेवटची तारीख दि. 18 जुलै 2024 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत ऑफलाईन पध्दतीने प्रत्यक्ष जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात जमा करावेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी आरती चिल्लारे (मो.7758863991) यांच्याशी संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.


