pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

सावता महासंघाच्या वतीने संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी (पुण्यतिथी) सोहळा राज्यभर साजरा करणार

श्री संतोष (अण्णा )डोंगरखोस संस्थापक अध्यक्ष सावता महासंघ महाराष्ट्र यांचे आवाहन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

सिंधीकाळेगा/प्रतिनिधी,दि.27

सावता महासंघ महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटना गेले तीन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये माळी समाजासाठी संस्थापक अध्यक्ष श्री संतोष (अण्णा )डोंगरखोस यांच्या नेतृत्वाखाली विशेष काम करत आहे. आजच्या घडीला महाराष्ट्रातील 10 ते 12 जिल्ह्यामध्ये सावता महासंघाचे काम चालू आहे, संघटना अत्यंत चांगल्या पद्धतीने सामाजिक काम करून समाजाची सेवा करत आहे.सावता महासंघ हि संघटना महाराष्ट्र पसरली आहे जिल्ह्या जिल्ह्यात सावता महासंघाच्या शाखा आहे.याचाच एक भाग म्हणून संत शिरोमणी सावता महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा पुण्यतिथी कार्यक्रम 3 ऑगस्ट 2024 रोजी आहे तो कार्यक्रम सावता महासंघाच्या वतीने महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचे आव्हान पदाधिकारी बांधवांना संस्थापक अध्यक्ष संतोष अण्णा यांनी केली आहे.सदरील संजीवन समाधी सोहळा साजरा करत असताना किर्तन, भजन, मिरवणूक (शोभायात्रा ), प्रतिमा पूजन,अन्नदान, रक्तदान शिबिर याचबरोबर विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवून संजीवन समाधी सोहळा साजरा करावा असे आव्हान सावता महासंघ संस्थापक अध्यक्ष श्री संतोष अण्णा डोंगरखोस यांनी केले.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे