तालुक्यातील मानेगाव जहॉगीर येथील जेष्ठ नागरीक निवृत्ती सटवाजी आचलखांब यांचे रविवार (ता.28) रोजी सकाळी 7.30 च्या सुमारास वयाच्या 103 व्या वर्षी वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्यावर मानेगाव येथील स्मशान भुमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुन, नातु, नातवंडे, पुतणे, पुतण सुना असा मोठा परिवार आहे. मानेगावचे माजी सरपंच राजेंद्र आचलखांब यांचे ते चुलते होत.