pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

उद्योगपती सुनील शेठ मढवी यांच्या हस्ते चिर्ले गावठाण मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.2

चिर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर पाटील यांनी आपल्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त ६५ सीसीटीव्ही कॅमेरे चिर्ले ग्रामपंचायत हद्दीत लावण्याचा संकल्प केला होता.हा संकल्प त्यांनी प्रत्यक्ष कृतीत उतरविला असून प्रसिद्ध उद्योगपती सुनीलशेठ शांताराम मढवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गावठाण चिर्ले गावात १६ सिसिटीव्ही कॅमेराचे डिजिटल पद्धतीने(ऑनलाईन पद्धतीने )रिमोट दाबून उद्योजक सुनील शेठ मढवी यांनी उदघाटन केले. उद्योजक सुनील शेठ मढवी यांच्या वाढदिवसा निमित्त सरपंच सुधाकर पाटील यांनी स्व खर्चातून गावठाण गावात सिसिटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या कामात प्रसिद्ध उद्योजक समिरशेठ पाटील यांचेही महत्वाचे सहकार्य लाभले आहे.चिर्ले व गावठाण गावात नोकरी धंद्या साठी बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने सिसिटीव्ही कॅमेराची नितांत गरज असून सदर सिसिटीव्ही कॅमेरा गावठाण गावात व चिर्ले ग्रामपंचायत हद्दीत बसविण्यात आल्याचे चिर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर (काका )पाटील यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सरपंच सुधाकर पाटील, उद्योजक समीर पाटील, ग्रामपंचायत सदस्य आकाश टकले, उद्योजक दिपक मढवी, शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते हिराजी मढवी, प्रभाकर पाटील, धोंडू पाटील, बाबुराव ठाकूर, अशोक पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, विविध सामाजिक कार्यकर्ते, नागरिक ग्रामस्थ यांनी सुनिलशेठ शांताराम मढवी यांना गुलाबपुष्प देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.उद्योगपती सुनिलशेठ मढवी यांच्या वाढदिवसा निमित्त सरपंच सुधाकर पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्व खर्चातून चिर्ले तसेच गावठाण गावात सिसिटीव्ही कॅमेरे बसविल्याने सरपंच सुधाकर ( काका )पाटील यांच्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे