pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जालना अंबड रोडवर (अंतरवाला) येथे पैशाच्या वादातून तरुणाचा खून

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.11

जालना : पैशांच्या देवाण-घेवानीच्या वादातून एका ३६ वर्षीय तरुणाचा आंतरवाला फाटा (ता. जालना) शिवारात धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी (दि.१०) सकाळी उघडकीस आला. योगेश गोवर्धन मोरे (वय ३६, रा. गोलापांगरी, ता. जि. जालना) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना ते अंबड रोडवर असलेल्या अंतरवाला गावाच्या शिवारातील नारायण काटकर यांच्या शेताच्या कडेला रोडलगत आज सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाजवळ एक दुचाकीही आढळून आली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच तालुका ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. दरम्यान, चौकशीत सदर मृतदेह गोलापांगरी येथील योगेश गोवर्धन मोरे याचा असल्याचे समोर आले. पोलिसांनी करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता पाठवला.

दरम्यान, अधिक चौकशी केली असता, योगेश मोरे याचा संशयित संदीप सदाशिव गायकवाड (रा. बोरी, ता. अंबड जि.जालना) याने पैशाच्या वादातून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी राजेंद्र मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित संदीप गायकवाड याच्या विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक निरीक्षक अंतरप अधिक तपास करत आहेत

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे