pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

सर्वसामान्य जनतेच्या मनात एकच विचार; वाल्मीक अण्णा आमचे पुढचे भावी आमदार

आष्टी- पाटोदा- शिरूर मतदार संघात वाल्मीक अण्णा यांच्या नावाची चर्चा

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

पाटोदा/ प्रतिनिधी,दि.16

बीड जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा मतदार संघ म्हणजेच आष्टी मतदार संघ या मतदारसंघात आष्टी पाटोदा शिरूर हे तीन तालुके येत असून या तीनही तालुक्यात नवीन चेहऱ्याला अधिक महत्त्व दिले जातं. येणाऱ्या विधानसभेसाठी देखील नवीन चेहरा म्हणून वाल्मीक अण्णा कराड यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. गेल्या वेळेस आमदार बाळासाहेब आजबे व भीमराव धोंडे यांच्या लढती मध्ये चुरस पाहायला मिळाली .परंतु गेल्या काही काळात वाल्मीक अण्णा ह्यांनी मतदार संघात विविध कामे करून अनेक गावाचा विकास केला आहे.त्यामुळे
येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आष्टी मतदार संघातून तरुणाईचा आणि सर्वसामान्य मतदारांचा नवीन चेहरा म्हणून वाल्मीक अण्णा कराड यांच्याकडे पाहिलं जात असून त्यांना आमदार करण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतला आहे. आणि कामाला देखील लागले आहे. येणाऱ्या विधानसभेला अण्णा यांना आमदार करण्यासाठी सर्वांनीच आपापल्या परीने काम सुरू केलेले देखील पाहायला मिळत असून सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे. पक्ष्याने त्यांना संधी द्यावी आमदार करण्यासाठी सर्व सामान्य जनता आणि तरुणाई सज्ज आहे असे देखील बोलले जात आहे..

आमचा पुढचा आमदार अण्णा च!

येणाऱ्या विधानसभेत आमदार म्हणून वाल्मीक अण्णा यांना पाहण्यासाठी तरुणाई आणि सर्वसामान्य जनता उत्सुक आहे. पक्षांनी तिकीट द्यावं निवडून आणण्याची जबाबदारी सर्वसामान्य जनता आणि तरुणाई घ्यायला तयार आहे असे मत प्रत्येक गावात व्यक्त होत आहे.आम्हाला अण्णा सारखे आमदार लाभले तर मतदार संघाचा कायापालट नक्कीच होणार असल्याची खात्री मतदार कडून होत आहे त्यामुळे त्यांच्या नावाची क्रेझ निर्माण झाली आसुन भावी आमदार अण्णाच होणार असा विश्वास व्यक्त होत आहे.

 

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे