अर्थ सावंत पद्मभुषण मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ ने सन्मानित
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3
उरणमधील अनेक विद्यार्थी-विद्यार्थीनींनी अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच उत्तम व नेत्रदीपक कामगिरी उरणच्या अर्थ केतन सावंत यांनी केल्याने त्याला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अर्थ सावंत याने स्केटींग या खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजाविल्यामुळे हॉकी लिजेंड पद्मभुषण मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
अर्थ सावंत याला राष्ट्रीय पुरस्कार २०२४ (कराड, सातारा) येथे सन्मानित करण्यात आले. यावेळी आशियाई सुवर्ण पदक विजेते ऍड.सुरेंद्र कालीरमन यांच्या टीमतर्फे दरवर्षी २९ ऑगस्ट हा दिवस हॉकीचे जादुगर मे. ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. यावेळी क्रीडापटूंना सन्मानित करण्यात येते. अर्थ केतन सावंत याला हा पुरस्कार मिळाल्याने अनेक प्रतिष्ठीत मान्यवरांनी त्याची भेट घेऊन त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. व्हाट्सअप, फेसबुक आदी सोशल मीडियावरही त्याच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


