pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

‘गौराई आली घरान पाहुनी गो’ या गीताला गणेश भक्तांची मोठी पसंती.

गीतकार मनिष भोईर,गायक जगदीश पाटील, गायिका रागिनी भगत यांच्या गीताचे सर्वत्र कौतुक. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गीत मोठया प्रमाणात व्हायरल.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.4

सर्वांचे आवडते सण म्हणजे गणेशोत्सव. आता गणेशोत्सव सण जवळ आला असून विविध गणेश फक्त गणपतीसाठी लागणारे साहित्य घेण्यात, साहित्य खरेदी करण्यात मग्न आहेत. यातच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश भक्तांना गणपती उत्सवाचा पुरेपूर व चांगला आनंद लुटता यावा यासाठी गीतकार मनिष भोईर (उरण – पाणजे ) यांनी ‘गौरी आली घरान पाहुनी गो’ हे गीत लिहिले असून या गीताचे गायन जगदीश पाटील,गायिका रागिनी भगत यांनी केले आहे. सध्या हे गीत सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गणेश भक्तांनी या गीताला मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. युट्युब चॅनेलला ‘गौराई आली घरान पाहुनी गो’ असे सर्च करताच लगेच हे सुंदर गाणे सर्वांना ऐकावयास व पहावयास मिळत आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक जगदीश पाटील यांनी गायलेले हे गाणे अतिशय तुफान वेगाने सर्वत्र व्हायरल होत आहे.या गीतात महाराष्ट्रातील गणेशोत्सव मधील संस्कृतीचे दर्शन पहावयास मिळते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे