शिक्षक दिन साजरा
जालना/प्रतिनिधी,दि.5
जालना तालुक्यातील भाटेपुर येथील ज्ञानेश्वरी इंग्लिश स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेमध्ये तिसरी आणि चौथीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापक, शिक्षण, शिक्षिका म्हणून शाळेचा पूर्ण कारभार पाहिला. सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक बनवण्याचा अनुभव व्यक्त केला. त्या सर्वांमधून आदर्श शिक्षक म्हणून तीन क्रमांक काढण्यात आले. त्यामध्ये प्रथम क्रमांक आर्यन खापरे, दुतीय क्रमांक दुर्वा टापरे आणि तृतीय क्रमांक शिवानी शिराळे यांना शाळेकडून ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक दिनानिमित्त मिठाई वाटप करण्यात आली.


