pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

मेघा ईस्ट्रा या सोसायटीमध्ये श्री सत्यनारायणाची महापूजा उत्साहात संपन्न.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.11

बुधवार दिनांक ११ सप्टेंबर २०२४ या रोजी उलवे नोड येथे सेक्टर १७, प्लॉट नंबर ४१,मेघा ईस्ट्रा या सोसायटीमध्ये श्री सत्यनारायणाची महापूजा मोठ्या थाटामाटात उत्साहात पार पडली.या पूजेसाठी मेघा ईस्ट्रा सोसायटीच्या एकमताने मनसेचे उलवे शहर अध्यक्ष राहुल बाबुराव पाटील व मनीषा राहुल पाटील यांना श्री सत्यनारायणाच्या पूजेचे मान सोसायटीच्या कमिटीच्या वतीने देण्यात आले.
मेघा ईस्ट्रा सोसायटी कमिटी अध्यक्ष राज अगस्ती, सचिव सुनील भागीनाथ वाघ,कोषाध्यक्ष अशोक कदम, सदस्य पूजा अविनाश शर्मा, विजय शेषराव खाडे, के रामदास, नीता खतवाल,मेघा संजय कुमार,प्रकाश पुजारी आदी सोसायटीचे पदाधिकारी सदस्य, ग्रामस्थ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.मेघा इस्ट्रा सोसायटीच्या वतीने नेहमी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. भारतीय सण संस्कृती परंपरा यांचेही जतन विविध उपक्रमांच्या माध्यमातून सोसायटीचे पदाधिकारी सदस्य करत असतात. भारतीय परंपरेत सत्य नारायण पूजेला अन्यण साधारण महत्व असून सदर धार्मिक कार्य मोठया उत्साहात संपन्न झाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे