pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेसाठी अर्ज करावेत

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 13 

पुण्यश्लोक आहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने धनगर व तत्सम जमातीसाठी 75 टक्के अनुदानावर 20 मेंढ्या आणि मेंढा नर वितरीत करण्यात येणार आहे. राज्यातील 34 जिल्ह्यातील ही योजना राबविण्यात येणार असून राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेसाठी ऑनलाईन अर्ज www.mahamesh.org या संकेतस्थळावर गुरुवार दि. 26 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करावेत.

            भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातींचा आर्थिक विकास व्हावा, यासाठी राजे यशवंतराव होळकर महामेष योजना राबविण्यात येत आहे. पायाभूत सोयी-सुविधा उभारण्यासाठी अनुदान दिले जाते. यामध्ये हिरवा चाऱ्याच्या मुरघास करण्यासाठी गासड्या बांधण्याचे यंत्र खरेदीसाठी 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान 20 मेंढ्या आणि 1 मेंढा एवढे पशुधन आहे अशा कुटुंबाना जुन ते सप्टेंबर या चार महिन्यासाठी प्रतिमाह  सहा हजार रुपये असे 24 हजार चराई अनुदान मिळणार आहे, तसेच कुक्कुट पालन करण्यासाठी 9 हजाराच्या मर्यादेत 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे. असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे