pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेला अर्ज करण्यास मुदतवाढ  

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 24

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शनिवार दि.18 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सेवा केंद्रावरुन किंवा इतर ठिकाणावरुन ऑनलाईन अर्ज दि.7 ऑक्टोबर 2024 पर्यंत सादर करण्यास आता मुदतवाढ मिळाली आहे. तरी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज वेळेत सादर करावेत, असे आवाहन अंबा-परतूर जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.जी. पवार यांनी केले आहे.

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी-2025 साठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी पाचवीच्या मुख्याध्यापकांकडून प्रमाणपत्र भरुन घ्यावे, तसेच प्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांचे छायाचित्र, स्वाक्षरी व पालकांची स्वाक्षरी करुन हे प्रमाणपत्र मुख्याध्यापकाद्वारे प्रमाणित करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज सादर करणे, जाहिरात, माहितीपत्रक, प्रमाणपत्र आदि www.navodaya.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्यासाठी प्रमाणपत्र, छायाचित्र, स्वाक्षरी 10 ते 100 केबीमध्ये स्कॅन करुन भरावेत. विद्यार्थ्यांचा जन्म       दि.1 मे 2013 ते 31 जुलै 2015 या कालावधीमधील असावा. जालना जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या व इयत्ता पाचवी वर्गात वर्ष 2024-25 मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी करता येणार आहे. असे प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, अंबा-परतूर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.                                                  

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे