जिल्हा कोषागार कार्यालयाचे सेवानिवृत्तीवेतन धारकांना आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि. 26
जालना कोषागारामार्फत सेवानिवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतन धारकांनी आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये एकत्रित निवृत्ती वेतन रु. 5 लाख 50 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांनी आयकर अधिनियम 1961 कलम 80 सी नुसार केलेल्या गुंतवणुकीची, बचतीची कागदपत्राची छायांकित प्रत दि. 14 ऑक्टोंबर 2024 पूर्वी पीपीओ क्रमांक, पेन्शनचे बँक खाते क्रमांक आणि पॅन कार्ड छायाकिंत प्रतीसह कोषागार कार्यालय, जालना येथे सादर करावीत.
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात आयकर कायद्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. आयकर विभागाच्या आयकर वसुलीचे नवीन सेक्शन 115 नुसार आयकर गणनेसाठी न्यु टॅक्स रिजीम व जुनी टॅक्स रिजीम असे दोन प्रकार ठरविण्यात आले आहेत. तरी आपण योग्य असणारा पर्याय निवडावा, आपण निवडलेले पर्याय कोषागार कार्यालयास नाव, पीपीओ क्रमांक, बँक व शाखेसहीत कळविण्यात यावे. जेणेकरुन आपण निवडलेल्या पर्यायानुसार देय होणारी टीडीएस वजाती करता येईल. असे जिल्हा कोषागार अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.


