pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

देशातील प्रमुख अकरा बंदरातील गोदी आणि बंदर कामगारांच्या वेतनामध्ये भरघोस वाढ करणारा वेतन करार संपन्न

गोदी आणि बंदर कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण!!

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.27

देशातील प्रमुख अकरा बंदरातील गोदी आणि बंदर कामगारांच्या वेतनामध्ये भरघोस वाढ करणारा वेतन करार संपन्न झाला.या यशस्वी करारा मुळे गोदी आणि बंदर कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.वेतन करार घडवून आणण्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावणारे भारतीय मजदूर महासंघाचे महामंत्री सुरेश पाटील व इतर पाच फेडेरेशनचे प्रमुख नेते, पी. एम. मोहम्मद हनीफ, एस. के. शेट्ट्ये, सी. डी. नंदकुमार, नरेंद्र राव, प्रभात सामंतराय, बी. मासेन, इंडियन पोर्ट्स असोसिएशनचे चेअरमन राजीव जलोटाजी (भा. प्र. से.), मॅनेजिंग डायरेक्टर विकास नरवाल (भा. प्र. से.), देशातील प्रमुख बंदरांचे अध्यक्ष उपाध्यक्ष, केंद्रीय श्रम आयुक्त सुनील माळी ह्यांच्या उपस्थितीत वेतन करारावर अगदी खेळीमेळीच्या वातावरणात मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी सह्या करण्यात आल्या. हया कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी नेमलेल्या ड्राफ्टिंग समितीचे व्यवस्थापकीय सदस्य श्रीमती शान्ति मॅडम व इतर सदस्यांनी भरपूर मेहनत घेतली. सदर प्रसंगी भारतीय पोर्ट आणि डॉक मझदूर महासंघाचे अध्यक्ष श्रीकांत राय, खजिनदार सुधीर घरत, गोपी पटनाईक, ज्ञानेश्वर सोनावणे,अनिल चिर्लेकर, दिपक जाधव, जेनपीए बोर्ड मेंबर रवींद्र पाटील, मंगेश ठाकूर, इ. हजर होते. या यशस्वी करारा बद्दल जेनपीए मधील सर्व कामगारांनी केंद्रीय मंत्र्याचे व कामगार संघटनाचे पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे