त्रिमूर्ती इंग्लिश स्कूल, मोहपुरी येथे आनंदनगरी सोहळ्याचे यशस्वी आयोजन

अंबड/प्रतिनिधी,दि.4
घनसावंगी तालुका व संपूर्ण जालना जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात नावजलेली संस्था म्हणून मोहपूर येथील त्रिमूर्ती इंग्लिश स्कूल ओळखली जाते. दर्जेदार व गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्याबरोबरच विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न बनवण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रमाचे शाळेच्या वतीने वेळोवेळी आयोजन केले जाते.
विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञानाचे मूल्य रुजवण्यासाठी व त्यांच्यात आर्थिक देवाण घेण्याचे कौशल्य विकसित होण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या अवचित त्याने आनंद नगरी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी नानाविध खाद्यपदार्थांची अनोखी मेजवानी सादर केली. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनीही आनंद नगरी उपक्रमात उस्फूर्त सहभाग नोंदवत सहकुटुंब सहपरिवार आनंद घेतला.
शेतातील रानमेवा महाराष्ट्र गुजरात पंजाबी दक्षिणात्य प्रसिद्ध खाद्य पदार्थ बरोबरच आरोग्यदायी पदार्थांनी विद्यार्थी, पालक,शिक्षकवृंद तृप्त झाले. आपल्या पाल्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या आनंदात सहभागी होताना महिला पालक मातांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
क्रांतीज्योती सावित्री माई फुले यांना प्रथम अभिवादन करून मान्यवरांचे हस्ते आनंदनगरी सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. पालक वर्गातून आनंद नगरी सोहळ्याचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल विशेष कौतुक करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक काळबांडे,संस्था सचिव ॲड. संजय काळबांडे प्राचार्य डोंगरे बी आर यांच्या मार्गदर्शनानुसार उपप्राचार्य गिरी मॅडम, नाटकर वी एल, खरात के.के, सातपुते एस यू, शिंदे एम आर, राजेश डोंगरे, सातपुते मॅडम,भालेकर मॅडम, बावस्कर मॅडम,चव्हाण मॅडम,मिन्धर मॅडम,जगदाळे मॅडम, सुरेश सातपुते, देविदास नाटकर, भारत खरात, संतोष साबळे, दत्ता निकम,नीता सातपुते, संजीवनी चांदगुडे आदींनी अथक परिश्रम घेतले.


