pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जालना येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची जाहीर सभा

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.4

जालना शहर महानगर पालिका निवडणूक  २०२६ च्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज दिनांक ०५ जानेवारी २०२६ रोजी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा डॉ. फ्रेझर बोईज मैदान, जालना येथे सकाळी ११.३० वाजता होणार आहे.

या सभेला भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर, भाजपा जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे, आ. संतोष पाटील दानवे, महानगर पालिका निवडणूक प्रमुख तथा माजी आमदार कैलासजी गोरंट्याल, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर, माजी आमदार विलास बापू खरात, सतीश घाडगे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे जालना महानगर पालिका क्षेत्रातील विकासकामे, आगामी नियोजन, पक्षाची दृष्टी आणि निवडणूक धोरण याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

तरी सर्व मतदार बंधु-भगिनी, नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी, जालना महानगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे