pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि. 13 

“ सामाजिक न्याय समता पर्व ” अभियानाअंतर्गत विभागाच्या विविध योजनांच्या अनुषंगाने थेट जनतेपर्यंत संवाद साधण्याच्या अनुषंगाने दिनांक 1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत विविध कार्यक्रम राबविण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. दि.13 एप्रिल 2023 रोजी समाज कल्याण, जालना व जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जालना येथील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .
कार्याशाळेमध्ये जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती उपायुक्त श्रीमती वैशाली हिंगे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र त्यांचे शैक्षणिक कामातील महत्व सविस्तर समजावून सांगितले. तसेच ऑनलाईन जात प्रमाणपत्र पडताळणी अर्जाबाबत विद्यार्थ्यांच्या असलेल्या प्रश्नाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समाज कल्याण सहायक आयुक्त अमित घवले यांनी “ सामाजिक न्याय समता पर्व ” अभियानाअंतर्गत विभागाच्या विविध योजनांच्या अनुषंगाने थेट जनतेपर्यंत संवाद साधण्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असेही सांगितले. कार्यशाळेमध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कविता प्राशर, महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे