pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

शेतकऱ्यांनी हरभरा बियाणांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.7

अन्न व पोषण सुरक्षा अभियान अन्नधान्य पिके सन 2024-25 अंतर्गत रब्बी हंगामामंध्ये पीक प्रात्यक्षिके तसेच प्रमाणित बियाणे वितरण याबाबीचे नियोजन करण्यात आले आहे. चालु वर्षी हरभरा या पिकासाठी महाडिबीटी प्रणालीद्वारे बियाणे या घटकासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी  mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

 पीक प्रात्यक्षिके ही बाब शेतकरी गटामार्फत राबविली जाणार आहे. पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्यांला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला आवश्यक असणाऱ्या बियाण्याचा 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय असणार आहे. या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्याची निवड महाडिबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जातुन ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर बियाणे, औषधे व खते या टाईल्स अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहेत. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे