pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

भाजपा युवा मोर्चा तर्फे बैठक संपन्न

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.24

महाराष्ट्रात २० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा साठी मतदान होणार असून महायुती तर्फे उरण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार म्हणून महेश बालदी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे पदाधिकारी कार्यकर्ते आता कामाला लागले आहेत.उरण तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे उरण पूर्व विभाग मध्ये चिरनेर, कळंबुसरे, मोठी जुई येथील बूथच्या ठिकाणी युवा मोर्चाची बैठक पार पडली. यावेळेस उरण तालुका युवा मोर्चा अध्यक्ष तेजस भाई, उरण तालुका सरचिटणीस रमेश(नाना) पाटील, उरण तालुका सचिव ॲड.साहिल हेमंत म्हात्रे, उरण तालुका सोशल मीडिया अध्यक्ष समीर पाटील,उरण पूर्व विभाग युवा मोर्चा अध्यक्ष प्रविण घासे, चिरनेर पंचायत गण अध्यक्ष सुशील पाटील उपस्थित होते. या वेळेस युवकांना व उपस्थितांना सर्व युवा नेत्यांनी संबोधीत केले व निवडणुकीत जास्तीत जास्त काम करण्यास प्रेरीत केले.या बैठकीस पदाधिकारी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे