रायगडचे सुप्रसिद्ध सूत्रसंचालक अतिश पाटील यांना पितृशोक
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.30
कला क्षेत्रात मागील चार पाच वर्ष रायगड मधील नामवंत सूत्रसंचालकामध्ये ज्यांनी आपल नाव मोठं केलं असे अतिश पाटील (पागोटे) यांच्या वडिलांचे अचानक आकस्मित निधन झाले.२५ ऑक्टोंबर २०२४ रोजी गांधी हॉस्पिटल पनवेल येथे त्यांचे निधन झाले.स्व द्वारकानाथ गोपाळ पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे एक निष्ठावंत व स्वाभिमानी कडवट असे कार्यकर्ते होते.अचानक पने झालेल्या निधना नंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.त्यांच्या या दुःखात सहभागी होण्यासाठी अनेक लोक भेट घेण्यासाठी ये जा करत असून मंगळवार दिनांक २९/११/२०२४ रोजी १९० विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरल्या नंतर प्रीतम म्हात्रे यांनी आपल्या सर्व पदाधिकारी समवेत पाटील कुटुंबियांची भेट घेतली.व कुटुंबाचे सांत्वन केले.कै.द्वारकानाथ पाटील यांचे दहावा विधी ३ नोव्हेंबर तर बारावा विधी ५ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांच्या घरी पागोटे येथे संपन्न होणार आहे. कोणत्याही प्रकारचे दुखवटे याप्रसंगी स्वीकारले जाणार नसल्याचे त्यांचे पुत्र अतिश पाटील व कुटुंबियांनी कळविले आहे. एक चांगला व्यक्ती आपल्यातून निघून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


