[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी, दि.30
श्री विशाल जैस्वाल यांनी टि.व्ही.एस. आयक्युव एस.टी. गाडी हि रक्कम रुपये पाच हजार देवुन बुक केली होती व त्यावेळी त्यांना गाडीची किंमत रु. 1,08,520/ असल्याचे कोटेशन सुध्दा देण्यात आले होते. मात्र गाडी दिनांक 22-04-2022 रोजी बुक करुन देखील प्रत्यक्ष गाडी बाजारात आणण्यात आली नव्हती. त्यामुळे श्री विशाल जैस्वाल यांनी अँड. महेश धन्नावत मार्फत ग्राहक आयोग, जालना येथे तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये आयोगाने प्रत्यक्षात गाडी वाजारात न आणता त्याची चुकींग करून ग्राहकांकडुन पैसे घेतले असे नमुद करण्यात आले होते. ग्राहक आयोगाने अॅड. धन्नावत यांचा युक्तीवाद ऐकुन टि.व्ही.एस. कंपनी तथा स्काय ऑटेव्हिल प्रा.लि. यांना सदरची टि.व्ही.एस. आयक्युब एस.टी. गाडी हि फक्त रु.1,08,520/- मध्ये देण्याचे आदेश दिले. तथा दंड सुध्दा लावले. आयोगाच्या आदेशाप्रमाणे जैस्वाल यांना सदरची गाडी ज्याची प्रत्यक्ष अंदाजे किंमत 2,10,000/ इतकी आहे, ती फक्त रु. 1,08,520/- मध्ये मिळाली, म्हणुन एका प्रकारे ग्राहक आयोगाच्या निर्णयाने दिवाळीच साजरी झाली असे श्री जैस्वाल यांनी प्रतिपादन केले. अँड.महेश धन्नावत यांनी सांगितले की, आपण कोणतीही वस्तु बुक केली, तर त्या संदर्भात कोटेशन घ्यावे जेणे करुन वेळेवर वस्तु प्राप्त झाली नाही, तर आपण ग्राहक आयोगाकडे दाद मागु शकतो.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


