pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

गांजाची शेती करणाऱ्यास पोलिसांनी घेतले ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखा व मौजपुरी पोलीसांची कारवाई

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.5

जालना जिल्हयात अवैध गांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बन्सल साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना अवैध गांजा विक्री करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.

त्यानुषंगाने दिनांक 04/11/2024 रोजी गुप्त बातमीदार यांचे मार्फतीन माहिती मिळाली की, मौजे बाजी उम्म्रद शिवारामधील शेतामध्ये  बद्री पवार, रा. बाजी उम्रद, ता.जि. जालना हा त्याचे शेतामध्ये मानवी आरोग्यास हानीकारक असलेला गांजाची शेती करुन स्वत:चे आर्थीक फायद्यासाठी गांजा विक्री करत आहे. अशी बातमी मिळाली या बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा जालना व मौजपुरी पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी मौजे बाजी उम्रद, ता. जि. जालना येथे बद्री पवार यांच्या शेतावर छापा मारुन त्याच्या गट क्र.433, बाजी उम्रद शिवारामधील शेतामध्ये पाहणी केली असता इसम नामे बद्री पवार हा त्याचे स्वतःच्या मालकीच्या शेतामध्ये गांजाचे एकुण 30 झाडांची लागवड करुन संवर्धन व जोपासना करीत असतांना मिळुन आला, त्यामुळे सदर गांजाची 30 झाडांचे पंचासमक्ष वजन केले असता ते 80 किलो 415 ग्रॅम असुन किंमत अंदाजे रु.20.10,375/- असल्याचे दिसुन आल्याने ते तपासकामी जप्त करण्यात आला असुन बद्री लक्ष्मण पवार, वय-50 वर्ष, रा.बाजीउम्रद, ता.जि. जालना याचेविरुध्द पोलीस ठाणे मौजपुरी, जालना येथे एन.डी.पी.एस. कायद्या प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बन्सल व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी, परतूर श्री. दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, मौजपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि. मिथुन घुगे, स्था.गु.शाचे अधिकारी सपोनि योगेश उबाळे, पोउपनि. राजेंद्र वाघ, संजय राऊत व सोबत स्थागुशाचे अमंलदार, रामप्रसाद पव्हरे, संभाजी तनपुरे, गोपाल गोशिक, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, सतिश श्रीवास, ईरशाद पटेल, आक्रूर धांडगे, गणेश वाघ तसेच मौजपुरी पोलीस ठाण्याचे अंमलदार संजय राऊत, दादा हरणे, पंकज बाजड, नितीन खरात, अविनाश मांटे, प्रशांत म्हस्के, प्रदीप पाचरणे, धोंडीराम वाघमारे इत्यादींनी केली आहे,

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे