pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

खासदार सुनील तटकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याबद्दल माजी आमदार महेंद्र थोरवे यांचा उरण तालुका राष्ट्रवादीकाँग्रेस पक्षातर्फे निषेध

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.9

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या विषयी माजी आमदार महेंद्र थोरवे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट )तर्फे जाहीर निषेध करण्यात आला. उरण तालुक्यातील नागाव रोड येथे उरण तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकूर यांच्या कार्यालयात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उरण विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर, तालुका परीक्षित परिषद ठाकूर,रायगड जिल्हा उपाध्यक्ष विदयानंद घरत,वाहतूक सेल रायगड उपाध्यक्ष नरेश घरत,उरण तालुका चरचिटणीस दिनेश पाटील, उरण तालुका उपाध्यक्ष रतन म्हात्रे,युवा कार्यकर्ता अक्षय घरत, गोपाळ म्हात्रे,राकेश पाटील, रमाकांत पाटील ज्ञानदेव म्हात्रे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी परीक्षित ठाकूर म्हणाले की खासदार सुनील तटकरे साहेबांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने महेंद्र थोरवे यांचा निषेध करीत आहोत. महायुतीचा धर्म सर्वांनी पाळावा,कोणीही चुकीची विधाने करू नये. आक्षेपार्ह विधाने करू नयेत. पुन्हा कोणीही तटकरे साहेबा विषयी आक्षेपार्ह विधाने करू नयेत. याची दक्षता घ्यावी. असे आवाहन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर यांनीही आक्षेपार्ह वक्तव्ये कोणीही करू नये. युतीचा धर्म सर्वांनी पाळावा. सर्वांनी एक दिलाने, एकत्र येत काम करावे असे आवाहन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे