pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

भाजपचे ग्रामपंचायत सदस्य सचिन घरत यांचा शेकाप मध्ये प्रवेश

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.13

जसखार गावातील भाजपचे ग्रामपंचायत सदस्य सचिन घरत व अनेक कार्यकर्त्यांनी प्रितमदादांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रितम म्हात्रे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
उरण विधानसभेचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या प्रचाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लावत आहे. घरोघरी भेट देऊन प्रीतम दादा म्हात्रे यांचा प्रचार वेगाने सुरू आहे. अनेकांच्या मदतीला आणि सुख दुःखात धावून येणारा म्हणून प्रीतम म्हात्रे यांची ख्याती आहे. प्रीतम म्हात्रे यांच्यामुळे शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. जसखार येथे भाजपला खिंडार पडले आहे. जसखार गावातील भाजपचे ग्रामपंचायत सदस्य सचिन घरत आणि अनेक कार्यकर्त्यांनी प्रीतम म्हात्रे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. यावेळी शेकापचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे