pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जालना शहरात विना परवाना जाहीरात फलक, होडींग व पोस्टर्स, बॅनर्स इत्यादी न लावण्याचे जालना महापालिकाचे आवाहन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.6

राज्यातील अनाधिकृत जाहीराती घोपणा फलक, होडींग व पोस्टर्स बाबत मा. उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिका क्र. 155/2011 मे. सुस्वराज्य फाऊंडेशन सातारा आणि इतर विरूध्द महाराष्ट्र राज्य आणि इतर या याचिकेवरील सुनावणीमध्ये मा. उच्च न्यायालयाने दिनांक 31/01/2017 रोजी विस्तृत निकाल दिलेला आहे. तसेच या प्रकरणात मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी वेळोवळी दिनांक 09/10/2024 व दिनांक 18/11/2024 रोजी अनाधिकृत फलक, होडींग व पोस्टर्स विरोधात कार्यवाही करणे बाबत आदेश पारीत करण्यात आलेले आहेत.

त्यानुसार जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व नागरीक / व्यवसायिक / एजन्सीधारक यांना दि.03/12/2024 रोजी जाहीर आवाहन करण्यात आले असुन सदर आवाहनामध्ये जालना शहर महानगरपालिकेच्या परवानगी शिवाय तसेच जालना शहर महानगरपालिकेने निश्चित केलेल्या जागे व्यतिरीक्त शहरात इतर कोणत्याही ठिकाणी विना परवाना जाहीरात फलक, होडींग व पोस्टर्स, बॅनर्स इत्यादी लावण्यात येऊ नये. तसे आढळल्यास संबंधिताविरूध्द दंड आकारून मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 तसेच महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरीता अधिनियम, 1995 अन्वये फौजदारी स्वरूपाची कार्यवाही प्रस्तावित येईल असे बातमीपत्र प्रिसिध्द करण्यात आले होते.

त्याअनुषंगाने मा.आयुक्त तथा प्रशासक महोदय जालना शहर महानगरपालिका जालना यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिमेव्दारे जा.श.म.पा. चे मालमत्ता विभाग व सर्व संबंधित स्वच्छता निरीक्षकांमार्फत जालना शहर हद्दीतील विविध हॉटेल्स, दवाखाने व इतर व्यावसायीक आस्थांपानांवर अशे एकुण 22 जणांवर रितसर पोलीस स्टेशनला गुन्हे नोंदविण्यात आले असुन दि. 04/12/2024 रोजी रात्रीच्यावेळी उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यावाही करण्यात आली असुन जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने मा. आयुक्त तथा प्रशासक महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली अनाधिकृत जाहिरात फलक लावण्या-यांविरुध्द हि विशेष मोहिम या पुढेही प्रभावीपणे चालु ठेवण्यात येत असुन अनाधिकृत होर्डीग्स, बॅनर, फ्लेक्स आढळुन आल्यास सदरचे होडींग जप्त करुन थेट गुन्हा दाखल करण्याची कारवाई म.न.पा. कार्यालयामार्फत करण्यात येईल. याची जालना शहरातील सर्व नागरीक / व्यवसायिक / एजन्सीधारक यांनी पुनःश्च नोंद घेऊन जालना शहर महानगरपालिकेस सहकार्य करावे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे