चि. करण व चि. वैष्णवी यांचा शुभविवाह उत्साहात संपन्न
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.7
लग्न म्हणजे पवित्र बंधन. दोन अतूट नात्याचे मिलन म्हणजे लग्न. हिंदू धर्मातील पवित्र संस्कार म्हणजे लग्न.अशा या पवित्र बंधनात चि.करण व चि.वैष्णवी बांधले गेले आहेत.तुर्भे गाव, नवी मुंबई येथील प्रसिद्ध उद्योगपती तथा सामाजिक कार्यकर्ते प्रमोद दगडू भोईर यांचे सुपुत्र करण (चंदन )भोईर यांचा शुभविवाह उरण तालुक्यातील वेश्वि येथील उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते राजू बळीराम मुंबईकर यांची जेष्ठ कन्या वैष्णवी(छकुली )हिच्या सोबत गुरवार दिनांक ५/१२/२०२४ रोजी सायंकाळी ५:१५ वाजता मु. कंठवली (तीर्थधाम )ता – उरण, जिल्हा – रायगड येथे मोठया उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच पर्यावरणप्रेमी, प्राणीप्रेमी संघटना, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वधू वरांना शुभाशिर्वाद देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सदर शुभ विवाह सोहळा अंत्यत उत्साहात संपन्न झाला.


