pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

स्वाभिमानीचा एल्गार, वगळलेल्या मंडळांना अनुदान देण्याचा निर्धार!

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

अंबड/ तनवीर बागवान,दि.18

घनसावंगी तालुक्यातील गुंज येथील झालेल्या सभेत पुजाताई मोरे बोलत असताना जाम समर्थ, कुं पिंपळगाव. मंडळातील अनेक गावे अतिवृष्टी अनुदानापासून वंचित ठेवले असून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या रोशाला वाचा फोडण्यासाठी दिनांक १७ एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेश अध्यक्ष पूजाताई मोरे यांची गुंज येथे जाहीर सभा झाली.

या सभेत पुढे बोलताना त्यांनी शासनाच्या धोरणांची चिरफाड करत. महावेद ची यंत्रणा अतिवृष्टीचे निकष, रेनगेज सिस्टीम कसे शेतकरी विरोधी आहेत. हे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. या मंडळातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांना एकजुटीचे आव्हान केले.

तसेच संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे पडेपर्यंत संघटना भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे असा विश्वास संघटनेच्या नेत्या पूजेताई मोरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला.

या सभेला महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती. या सभेला प्रमुख अतिथी म्हणून संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पूजाताई मोरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी कार्यक्रमास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भागडे, महादेव भिलारे बाळासाहेब शिंगरे भारत ऊडे. युवा संघर्ष समितीचे तौर सह त्यांची टीम उपस्थित होती.

यावेळी शेतकरी कन्या पूजाताई मोरे यांची धान्य तुला करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे