pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

बजाजनगर येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त च्या नाम घोषात श्री दत्त जयंती उत्सव उत्साहात साजरा

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

छ.संभाजीनगर /आनिल वाढोणकर,दि.17

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ-त्र्यंबकेश्वर अंतर्गत बजाजनगर येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दिनांक १५ डिसेंबर रोजी श्री दत्त जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. उत्साहासाठी हजारो भाविक सेवेकऱ्यांची उपस्थिती होती. श्री दत्त जयंती निमित्त अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाच्या सातव्या दिवशी सकाळी महाभिषेकानंतर बलीपुर्णाहुती विधी करण्यात आला. यानंतर देवीचे अकरा अलंकार भाविक सेवेकऱ्यांनी यज्ञकुंडामध्ये अर्पण केले. दुपारी १२.३० वाजता श्री गुरूचरीञ ग्रंथातील चौथा अध्याय वाचन करून १२.३९ मिनिटांनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या नामगजरात श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला. श्री दत्त जन्मोत्सव नंतर महाआरती करण्यात आली.दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या १८ विभागांची ओळख करून देताना परमपूज्य गुरूमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या राष्ट्र कल्याणच्या उद्दीष्ट व कार्य पध्दतीची ओळख मार्गदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आली. गर्भसंस्कार, शिशु संस्कार, बालसंस्कार, युवा प्रबोधन, प्रश्नोत्तर विभाग, दुर्ग संवर्धन, वास्तुशास्त्र विभाग व श्री गुरुचरित्र ग्रंथ या महत्वाच्या विषयावर केंद्र प्रतिनिधी श्री. संतोष पाटील यांनी मार्गदर्शन केले. दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी परमपूज्य गुरुमाऊलींच्या पावन सान्निध्यात श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ येथे अभूतपूर्व होणाऱ्या श्री चक्रराज श्री यंत्र पुजन व अतिरुद्र पठण सेवेच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण माहिती मार्गदर्शनाच्या माध्यमातून देण्यात आली.सप्ताह काळात विविध प्रकारच्या अतिउच्च अध्यात्मिक सेवेत सेवेकऱ्यांनी सहभाग घेतला. २३६९ महिला – पुरुष सेवेकऱ्यांनी श्री गुरूचरीञ पारायण केले. तसेच हजारोंच्या संख्येने श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण, श्री दुर्गा सप्तशती पाठ व रूद्रावर्तने करण्यात आली.

सप्ताह कालावधीतील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या २०% अध्यात्म आणि ८०% समाजकार्य या सुत्रातून विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ११ डिसेंबर रोजी दुपारी २ ते ४ वेळेत गर्भसंस्कार शिबीर घेण्यात आले. एकूण १६५ नवविवाहित व गरोदर महिलांनी गर्भसंस्कार शिबीराचा लाभ घेतला. दिनांक १२ डिसेंबर रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत सर्वरोग निदान शिबीर घेण्यात आले. एकूण ८७० भाविक सेवेकऱ्यांनी शिबीराचा लाभ घेतला. दिनांक १३ डिसेंबर रोजी दुपारी २ ते ४ वेळेत शिशुसंस्कार शिबीर घेण्यात आले. एकूण १३० महिलांनी सदरील शिबीराचा लाभ घेतला. दिनांक १६ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० ते २.०० या वेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. १०८ भाविक सेवेकऱ्यांनी रक्तदान शिबीरात सहभागी होऊन रक्तदान केले.

दिनांक १६ डिसेंबर रोजी सकाळी श्री सत्य दत्त पुजन करण्यात आले. सकाळी भुपाळी आरतीनंतर प्रहरे उतरवून अखंड-नाम-जप-यज्ञ सप्ताहाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.
पंचक्रोशीतील जवळपास ३०,००० भाविक सेवेकऱ्यांनी महानैव्यद्य आरती व महाप्रसादाचा लाभ घेतला. उत्सव सुरळीत होण्यासाठी सर्व युवा प्रबोधन व युवती प्रबोधन मधील युवक व युवतीने तसेच महिला – पुरुष सर्व सेवेकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे