pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

सत्यशोधक समाज प्रतिष्ठान महाराष्ट्र या चळवळीचे कार्याध्यक्ष मा.डॉ.प्रा.अनंत राऊत यांचा ‘ईव्हीएम हटाव बॉलेट पेपर वर मतदान व्हावे’ यासाठी जिल्हाधिकारी नांदेड येथे बेमुदत धरणे आंदोलनास जाहिर पाठिंबा

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटील,दि.18

महाराष्ट्रातील नामवंत सुप्रसिद्धवक्ते,साहित्यिक,विचारवंत आणि सत्यशोधक समाज प्रतिष्ठान महाराष्ट्र या चळवळीचे कार्याध्यक्ष मा.डॉ.प्रा.अनंत राऊत सर यांनी आज दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर गेल्या 10 तारखेपासून चालू असलेल्या ” evm हटाव लोकशाही बचाव ” जनआंदोलन कृतीसमितीच्या कार्यकर्त्यांना भेट देऊन विचार पुस केली. आंदोलनाचे उद्दिष्ट ,कार्यपद्धत, पुढील दिशा यावर चर्चा केली.आंदोलन कर्त्यांचा परिचय करून घेतला.आणि सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.त्याबरोबरच सत्यशोधक समाज प्रतिष्ठान चां या उपक्रमास जाहिर पाठिंबा असल्याचे सांगितले.
या प्रसंगी सोसियल मिडियास मुलाखत देताना असे सांगितले की,” गेल्या विधानसभा निवडणुकीत गडबड झाल्याची चर्चा मीडियावर होत आहे,एक्झीट पोल ,राजकीय विश्लेषक,जनतेतील चर्चा ही एकाच पक्षाला पाशवी बहुमत मिळणार नाही,अशीच होती.पण निवडणुकीचे निकाल हे अनपेक्षित आणि अनाकलनीय असेच आहेत.म्हणून evm मशीन बद्दल शंका निर्माण झाली आहे.जीची चर्चा व विरोध होताना दिसतो आहे.निवडणुका ह्या पारदर्शी निष्पक्ष निर्भय वातावरणात झाल्या पाहिजे,असे भारतीय संविधान सांगते. लोकशाहीत जनता सार्वभौम असते.म्हणून जनतेची प्रतिक्रिया आणि शंका याकडे दुर्लक्षित न करता गांभीर्याने या मागणीकडे पाहिले पाहिजे.आणि जनतेची ईच्छा नसेल तर evm ऐवजी बायलेट पेपरवर मतदान झाले पाहिजे.अशी प्रतिक्रिया राऊत सरांनी माध्यमांशी बोलताना दिली.
याप्रसंगी शाहिर दत्ता तुमवाड,कॉ.दिंगाबर घायाळे, नामदेव गवलवाड, गोपाळ गायकवाड,अशोकराव भवरे इत्यादी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे