pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

अपहार प्रकरणातील परदेशात पळून जाणाऱ्या उरणच्या बंटी बबलीला दिल्ली विमानतळावरून अटक

परदेशात शिक्षण आणि नोकरी देण्याच्या बतावण्या करून प्रतिष्ठित डॉक्टर दांपत्याची केली होती फसवणूक. लिवी ओव्हरसीज स्टडी प्रायव्हेट लिमिटेड संस्थेचा प्रताप. जुगनू कोळी आणि तेजस्वी कोळी विरोधात गुन्हा झाला होता गुन्हा दाखल. न्यायाल्याकडून अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर परदेशीं पालायनाचा होता प्लान.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.20

नवी मुंबई मधील नेरुळ, सिवूड्स येथे राहणाऱ्या डॉक्टर दांपत्याला तब्बल ३ कोटी ३० लाखांचा उरणमधील जुगनू कोळी आणि तेजस्वी कोळी या बंटी-बबलीच्या जोडीने गंडा घाटल्याची घटना घडली होती. याबाबत नवी मुंबई, एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यातील आरोपिंना न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर परदेशात पलायनाच्या प्रयत्नात असताना, या बंटी बबलीच्या जोडीला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानातळावरून अटक करण्यात आली आहे.

मुलांना परदेशात शिक्षण आणि डॉक्टर दांपत्याला नोकरी देतो असे सांगून, ‘लिव्ही ओव्हरसीज स्टडीज प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक जुगनू कोळी आणि तेजस्वी कोळी यांनी कोट्यावधी रुपये उकळले असल्याबाबत उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, या गुन्ह्यातील आरोपी बंटी, बबलीने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात दाद मागीतली होती. मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटालला होता. यामुळे न्यायलायीन प्रक्रियेला सामोरे जात कारवाईला सामोरे जावे लागूनये म्हणून, परदेशात जाण्याचा प्रयत्न केला असता, या जोडीला दिल्ली विमानतळावर अटक करून ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायाल्याने या प्रकारनंतर तेजस्वी कोळी हिला न्यायालयीन कोठडी दिली असून, जुगनू कोळी याला पुढील तपासासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण प्रकारामध्ये डॉक्टर दांपत्याच्या दोनही मुलांचे दोन शैक्षणिक वर्षांचे नुकसान झाले आहे. याबाबत नवीमुंबई एनआरआय पोलीस ठाण्यात कलम ४०६, ४२०, ४६५ अन्वये गुन्हा दाखल आहे.आर्थिक फसवणूक करणाऱ्या अशा व्यक्तींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे