pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जालना येथील दुकानदारावर महापालिकेची मोठी कारवाई

90 हजाराचे केले प्लास्टिक नष्ट

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि 24

शहरात एकल प्‍लास्‍टीक (Single Use Plastic) साठाबाबत माहिती मिळाल्‍यानुसार जालना शहर महानगरपालिकेमार्फत आज दिनांक २४.१२.२०२४ रोजी दुकानदार/आस्‍थापना शिव शंकर ट्रेडर्स, जालना यांच्‍याकडे प्‍लास्‍टीक आढळुन आल्‍याबाबत त्‍यांच्‍यावर ५,०००/- अक्षरी पाच हजार रुपये दंड व ६८० किलो प्‍लास्‍टीक जप्‍त करण्‍यात आले. प्‍लास्‍टीकचे अंदाजित किंमत ८०-९० हजार रु. आहे. सदरच्‍या कार्यवाहीमध्‍ये जालना मनपाच्‍या सहायक आयुक्‍त श्रीमती सुप्रिया चव्‍हाण, स्‍वच्‍छता विभाग प्रमुख पंडीत पवार, स्‍वच्‍छता निरीक्षक श्री. अशोक लोंढे, श्री. शोएब खान, श्री. अरुण वानखेडे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

करिता जालना शहर महानगरपालिकेमार्फत शहरातील सर्व आस्‍थापना/दुकानदार व नागरिक यांना  आवाहन करण्‍यात येते की, शासनाकडुन एकल प्‍लास्‍टीकचा (Single Use Plastic) वापर, वाहतुक, विक्री व साठाबाबत बंदी असुन एकल प्‍लास्‍टीकचा वापर, विक्री वाहतुक व साठा करु नये याबाबत सहकार्य करावी ही विनंती.

जालना शहर महानगरपालिका मार्फत याबाबत आज दुसरा दिवस आहे.  तरी जालना मनपा व महाराष्‍ट्र प्रदुषण मंडळामार्फत याबाबत नियमितपणे तपासणी/पाहणी करण्‍यात आहे.  प्‍लास्‍टीक वापरकर्त्‍यांवर दंडनीय कार्यवाही करुन गुन्‍हा नोंद करण्‍याबाबतची देखील कार्यवाही करण्‍यात येणार आहे.  तसेच शहरात ज्‍याठिकाणी प्‍लास्‍टीक वाहतुक, विक्री, वापर व साठा होत असेल तर याबाबत जालना मनपास अवगत करुन सहकार्य करावे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे