ब्रेकिंग
नवीन दुग्ध व मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांना आवाहन
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि.27
केंद्र शासनामार्फत (सहकार से समृध्दी) अंतर्गत देशभरात 54 उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत असून त्यामध्ये राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्याला आणि महिलांना समाविष्ट करुन दुग्ध व्यवसाय सहकारी संस्थामार्फत समृध्द करणे हा उद्देश निश्चित करण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत एनडीडीबी व राज्य शासनामार्फत राज्यात सन 2024-25 या कालावधीत 5 हजार 56 नवीन दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था नोंदणी करण्याचे उदिष्ट निश्चित केले आहे. तरी जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त दुग्ध सहकारी संस्थांनी नोंदणी करावी, असे आवाहन सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


