pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती  योजनेच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना आवाहन 

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 3 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीची सन 2021-22 व 2022-23 वर्षांतील केंद्र शासनाची 60 टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे.  विद्यार्थ्यांच्या खात्यात अशी रक्कम जमा झाली आहे अथवा काही दिवसांत जमा होईल. तरी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्जातील मंजुर एकुण निर्वाह भत्ता रक्कमेच्या 60 टक्के रक्कम वजा करुन उर्वरित रक्कम महाविद्यालयात जमा करावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त प्रदीप भोगले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

केंद्र शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे. या योजनेतंर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 17 मार्च, 2022 व 7 जुलै, 2023 या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची 60 टक्के हिस्याची रक्कम महाडीबीटी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा झाल्यानुसार विद्यार्थ्यांनी त्यांना अनुज्ञेय असलेल्या निर्वाह भत्ताची रक्कम वजा करून उर्वरित शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क, इतर ना परतावा शुल्काची रक्कम संबंधित महाविद्यालयास 7 दिवसांच्या आत जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. तरी भारत सरकार शिष्यवृत्तीविषयक रक्कम महाविद्यालयात जमा करणेबाबतची कार्यवाही न केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची राहील, याची नोंद घ्यावी. असेही कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे