pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

उघड्यावरील अन्न खाल्ल्याने ५ मुलांना विष बाधा

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.29

दिघोडे बस स्थानका जवळील उघड्यावर विकला जाणारा सुरमा हा खाद्यपदार्थ मूलांनी खाल्याने ५ जणांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी ( दि२९) घडली आहे.त्यामुळे सदर मुलांच्या पोटात दुखायला लागले व उलट्या होऊ लागल्याने त्यांना तातडीने चिरनेर गावातील रवि क्लिनिक या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता रुग्णालयातील डॉक्टर प्रकाश मेहता यांनी सदर मूलांवर उपचार सुरू केले.सदरची विष बाधा ही सुरमा हा खाद्यपदार्थ खाल्याने झाला असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

अन्न व औषध प्रशासनाने पैशाच्या हव्यासापोटी उरण तालुक्याकडे दुर्लक्ष केल्याने आज शहरात व तालुक्यातील अनेक गावातील नाक्यांवर राजरोसपणे उघड्यावरील खाद्यपदार्थ परप्रांतीय नागरीक विक्री करत आहेत.त्यामुळे उघड्यावरील अन्न खाल्ल्याने अनेकांना उलट्या,पोटात दुखण्याची कारणे समोर येत आहेत.त्यातच शनिवारी ( दि२९) दिघोडे बस स्थानका जवळील रस्त्यावर विकला जाणारा सुरमा हा खाद्यपदार्थ शुभम पाटील,शुभम ठाकूर,निशांत भगत,रोहन पाटील व एक लहान मुलगा यांनी खाल्ल्याने त्यांना पोटात दुखायला लागले तसेच उलट्या होऊ लागल्याने त्यांना तातडीने चिरनेर गावातील रवि क्लिनिक रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.रुग्णालयातील डॉ प्रकाश मेहता यांनी सदर रुग्णांवर उपचार सुरू केले.परंतु आज डॉ प्रकाश मेहता यांच्या तत्परतेने सदर रुग्णांचे प्राण वाचले आहे.तरी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नागरीकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या उघड्यावरील विक्री करणाऱ्या अशा व्यवसायिकांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

————————————————————-

सदर रुग्णांनी उघड्यावरील सुरमा हा अन्न पदार्थ खाल्ल्याने त्यांना फुड पँयजन ( अन्नातून विषबाधा) झाले आहे.त्याची प्रकूती चांगली आहे.तरी नागरीकांनी विशेष करून लहान मुलांनी उघड्यावरील अन्न पदार्थ खाऊ नयेत – डॉ प्रकाश मेहता

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे