मराठवाडा शिक्षक संघांची, धडक आता विभागीय बोर्डावर, आज बोर्डासमोर धरणे आंदोलन
दहावी- बारावी चे केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, परीक्षक, मॉडरेटर,चिफ मॉडरेटर यांचे मानधन वाढविणे या व इतर मागण्यांसाठी आज छ. संभाजीनगर येथील विभागीय बोर्डासमोर आंदोलन
जालना/प्रतिनिधी, दि.08
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ दहावी व बारावीच्या परीक्षा आयोजित करते. ही परीक्षा संपन्न करण्यासाठी परीक्षा आयोजित करण्यात केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे तर त्यानंतर परीक्षक, मॉडरेटर, चिफ मॉडरेटर हे पेपर तपासणी करून निकाल लावण्यात महत्वाची भूमिका निभावतात.
या परीक्षेसाठी विद्यार्थ्यां कडून परीक्षा शुल्क आकारले जाते. केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, लिपिक, शिपाई, परीक्षक, मॉडरेटर, चिफ मॉडरेटर यांचे मानधन वाढविण्यात यावे अशी मागणी आहे.
विद्यार्थी परीक्षा शुल्कात अनेकदा वाढ करण्यात आली आहे. परंतु केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, लिपिक, शिपाई,परीक्षक, मॉडरेटर, चिफ मॉडरेटर यांचे मानधन परीक्षा खर्च अनेक वर्षांपासून वाढविण्यात आलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाचे काम करणाऱ्या या घटकांवर मधे प्रचंड असंतोष व नाराजी आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाने दिनांक 08 जानेवारी 2025 या दिवशी दुपारी 04 ते 06 या वेळेत छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागीय शिक्षण मंडळाशी संलग्न जिल्ह्य़ातील शिक्षक, मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, मराठवाडा शिक्षक संघाचे कार्यकर्ते, केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, लिपिक, शिपाई,परीक्षक, मॉडरेटर, चिफ मॉडरेटर यांनी आंदोलनात प्रचंड संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे.असे आवाहन ज्ञानोबा वरवट्टे, प्रेमदास राठोड, आरिफ कुरेशी, डॉक्टर मारुती तेगमपुरे, डॉक्टर पुरुषोत्तम जुन्ने, रमेश आंधळे, संजय येळवंते, जगन वाघमोडे, भीमाशंकर शिंदे, नारायण मुंडे, प्रदीप काकड शेरे,पडघन सर, गणेश चव्हाण, रमेश गाडे, गणेश मेहत्रे, आनंदा वाघ, कुदर सर, डोईफोडे सर, लंके सर, खरात सर, चौधरी सर, पांडुरंग राठोड,भगवान धनगे व सर्व मराठवाडा शिक्षक संघटनेवर प्रेम करणारे संघटनानिष्ठ कार्यकर्ते यांनी केले आहे


