pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी आवाहन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.22

इयत्ता अकरावी व बारावी तसेच बारावी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या व शासकीय वसतिगृह प्रवेशापासून वंचित असलेल्या अनुसूचित जातीच्या व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येतो. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांनी अर्जाची प्रत आवश्यक कागदपत्रासह समाज कल्याण कार्यालयात शुक्रवार दि. 31 जानेवारी 2025 पर्यंत सादर करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जाची प्रत सादर करतेवेळी जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, मागिल वर्षाची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, विद्यार्थी हमीपत्र, महाविद्यालय हे महापालिका किंवा नगरपालिका अथवा नगरपंचायतीच्या 5 किलोमिटरच्या आत असल्याचे प्रमाणपत्र, महाविद्यालयाचे उपस्थिती प्रमाणपत्र, भाडे करारनामा, खंड प्रमाणपत्र आदि आवश्यक कागदपत्रे जमा करावी. अर्जासह कागदपत्रे दि.31 जानेवारी 2025 पर्यंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना येथे सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत स्विकारली जातील, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे