pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

शालेय पोषण आहार कामगाराचे तीन महिन्याची थकीत वेतन देणेबाबतची मनसेची मागणी

आंदोलनाचा दिला इशारा

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.25

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मागणी करण्यात आली की, जाफ्राबाद तालुकातील शालेय पोषण आहार कामगारांचे मागील तीन महिन्यापासून थकीत वेतन मिळाले नाही शालेय पोषण आहार कामगारांचे थकीत वेतन त्वरित अदा करून कामगारांना किमान वेतन लागू करा केरळ राज्याच्या धर्तीवर अठरा हजार रुपये मानधन द्या सन २०२४ मध्ये केलेली वाढ त्वरित कामगाराच्या खात्यात जमा करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे केंद्र सरकारने शहरी व ग्रामीण भागात इयत्ता पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या मुला मुलींसाठी मध्यान्ह भोजन योजना सन २००२- २००३ पासून सुरू केली आहे, केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमानाने ही योजना संपूर्ण देशात राबवली जाते,शाळेतील पटसंख्या वाढावी मुलांची गळती थांबवावी या हेतूने योजना लागू करण्यात आली आहे परंतु गोरगरिबाच्या मुलांचे कुपोषण दूर करणाऱ्या कामगारांना आजही अत्यंत तुटपूजा मानधनावर काम करावे लागते गेल्या तीन महिन्यापासून त्यांचे मानधन देखील मिळाले नाही त्यामुळे कामगाराचे प्रचंड हाल होत आहे, यामध्ये काम करणाऱ्या महिला विधवा परित्यक्ता दलीत आदीवाशी अल्पसंख्याक समुदायातील आहे. फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्र मध्ये शिक्षण विभागात काम करणाऱ्या कामगारावर इतक्या कमी मानधनावर काम करण्याची वेळ येते हे दुर्दैव असल्याचे नमूद करण्यात आले, गट शिक्षणाधिकारी साहेब यांना मागणी करण्यात येते की कामगाराचे मानधन लवकरात लवकर थकीत वेतन मिळावे अन्यथा महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल उपस्थित पंढरीनाथ म्हस्के मनसे तालुका सरचिटणीस, संतोष पंडित,संजय शिंदे,मंगेश राजपूत तालुका उपाध्यक्ष, सुनील जोशी शहर अध्यक्ष,ज्ञानेश्वर सवडे,संतोष सवडे,यांची उपस्थिती होती

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे