pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

दिव्यांगाना न्याय हक्क लोकप्रतिनिधी देत नसतील तर मतदान कार्ड परत घ्या जिल्हाधिकारी नांदेड येथे दिव्यांगाचे ठिय्या आंदोलनात प्रशासन जागे दिले लेखी आदेशामुळे तात्पुरते आंदोलन स्थगित

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

नांदेड/प्रतिनिधी,दि 25

सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आज २५ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय मतदार दिनी शेकडो दिव्यांगांनी आप आपले मतदान कार्ड जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना परत करण्यासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली, देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्ष पूर्ण होत ७८ वे वर्ष सुरू झाले तरी दिव्यांगांना आपल्या अन्न वस्त्र निवारा या मूलभूत सोयी सुविधांसह शासनाच्या विविध योजनांपासून अद्याप वंचित रहावे लागल्यामुळे तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्था/नागरी स्वराज्य संस्था, खासदार आमदार यांच्याकडील सुद्धा दरवर्षीचा निधी दिव्यांगांवर खर्च केला जात नसल्याने संतप्त शेकडो दिव्यांगांनी आम्ही आजवर मतदान करून निवडून आलेले लोकप्रतिनिधी जर आमच्या समस्या सभागृहात मांडत नसतील तसेच आमचा राखीव निधी ते खासदार, आमदार खर्च करत नसतील तर मग आम्ही मतदान तरी का व कोणाला करावे? अशी कठोर भुमिका दिव्यांगांनी आज
जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत भारत निवडणूक आयोगाकडे दिव्यांगांनी केली आहे. तसेच मतदान कार्ड परत करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासाठी आमचे मतदान कार्ड परत घ्या म्हणत जिल्हाधिकारी कार्यालय परीसरातच प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दंडाधिकारी शाखेचे दिवाकर सर यांना दिव्यांगाचे निवेदन घेण्यासाठी पाठविले असता दिव्यांगांनी निवेदन व आपले मतदान कार्ड परत दिले असता दिवाकर यांनी मतदान कार्ड मला परत घेण्याचा अधिकार नाही मी तुमचे निवेदन स्विकारतो म्हणताच दिव्यांगांनी जिल्हाधिकारी कार्यालय मुख्य द्वार समोरच तीन ते चार तास ठिय्या केला, तदनंतर परत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या भुमिकेची त्वरित दखल घेऊन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिव्यांगाच्या मागण्या मान्य करण्याचे संबंधित अधिकारी यांना १५ फ्रेबु.२०२५ पर्यंत आदेशित करून लेखी आश्वासन दिले तात्पुरता यावेळी जिल्ह्याचे खासदार प्रा.रवींद्र चव्हाण हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपल्या कामानिमित्त आले असता संतप्त दिव्यांगांनी त्यांचा घेराव करत अनेक प्रश्नांचा भडीमार केला तेंव्हा त्यांनी दिव्यांगांचा खासदार निधी नियमानुसार खर्च करण्याचे आश्वासन दिले.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या लेखी पत्रामुळे सकाळपासूनच संतप्त असलेल्या दिव्यांगांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले, या आक्रमक भुमिकेचे नेत्रत्व राहुल साळवे, चंपतराव डाकोरे पाटिल, आदित्य पाटील यांनी केले तर या आंदोलनात प्रदिप हणवते,रवि कोकरे,शिवाजी सुर्यवंशी,शेख उमर, कार्तिक भरतीपुरम, धर्मेंद्र नालटे.शेषेराव वाघमारे, सय्यद आरिफ, मोहसिन खान, मुंजाजी कावळे,शेख आतिक, भोजराज शिंदे, कल्पना सप्ते,मुकबधीर कर्णबधिर दिव्यांग संघटनेसह शेकडो दिव्यांग बांधव आणि भगीनी उपस्थित होते.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे