pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

मोर्शी जवळ डुक्‍कर आडवे आल्‍याने भरधाव कारचा अपघात एक महिला ठार १४ जखमी

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

मोर्शी/प्रतिनिधि,दि.29

मोर्शी : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात भाईपुर फाट्याजवळ वराह आडवा आल्याने भरधाव तवेराचा अपघात झाला. यात एक महिला ठार झाली असून १४ जण जखमी आहेत. हा अपघात सोमवारी (दि.२७) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाला.
अपघातातील जखमी कुटुंब हे परतवाडा नजीक असलेल्या खरपी येथून तवेरा गाडी क्रमांक एम.एच.१२ एफझेड ११९६ ने वरुड येथे जात होते. दरम्यान मार्गातच भाईपुरा फाट्याजवळ त्यांच्या वाहनासमोर अचानक वराह आडवे आले. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. अपघातात साजीया बानो अकरम अली (वय ४०, रा.खरपी ता.परतवाडा) ही महिला घटनास्थळीच ठार झाली आहे.
जखमींमध्ये आलिशा फतेमा (वय ९ वर्ष), आयेष फातिमा (वय १०वर्ष), जेहान अली (वय १२ वर्ष), मोसीम खान (वय ३४ वर्ष), इलायत अली (वय ४० वर्ष), शीजा फातिमा (वय १४ वर्ष), अत्तहर खान (वय १३वर्ष), शहिदा बानो (वय ५० वर्ष), जहेर असलम अली (वय ५ वर्ष), फराह अंजुमन असलम अली (वय ३० वर्ष), अलीजा फतेह (वय ७ वर्ष), आरजू फत्तेमा (वय ४ वर्ष), बीबी नाज (वय ३० वर्ष) यांचा समावेश आहे.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. येथे औषधोपचार केल्यानंतर सर्व गंभीर जखमींना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास मोर्शी पोलीस करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे