pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

सुरंगली सरपंच पदाचा पदभार उपसरपंच सौ.सुनीताताई संतोष काळे यांनी स्विकारला

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

भोकरदन/संजीव पाटील,दि.30

भोकरदन तालुक्यातील सुरंगली येथील ग्रामपंचायत सरपंच पदाचा पदभार उपसरपंच सौ.सुनीताताई संतोष काळे यांनी आज स्विकारला. जालना जिल्हा जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या आदेशा नुसार सुरंगली ग्रा.प. चे सरपंचासह पाच सदस्य अपात्र ठरविण्यात आले होते.मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने पाच सदस्यांवर अपात्र तेची कारवाई करण्यात आली.त्यामुळे अकरा पैकी सरपंच सह पाच सदस्य अपात्र ठरविण्यात आले होते. त्यामुळे सरपंच पद रिक्त होते.भोकरदन चे गटविकास अधिकारी सुरडकर यांनी आदेशानुसार उपसरपंच सौ.सुनीताताई संतोष काळे यांना सरपंच पदाचा पदभार देण्यात आला. आज ग्रा.प. कार्यालयात उपसरपंच सुनिता काळे यांनी अधिकृत सरपंच पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमास ग्रामसेवक संजय पाजगे, भाऊसाहेब काळे, प्रल्हाद रामचंद्र काळे, माजी उपसरपंच एकनाथ राव भराड,शेख रुबाब,शे.एजाज बब्बु भै,शेख समद भै पत्रकार, धनराज काळे, काशीनाथराव दांडगे, संतोष काळे, दिनकर काळे, सुभाष वर्पे पत्रकार, माजी सरपंच पत्रकार संजीव पाटील,संजय काळे,घनश्याम बोर्डे, अरुण गवळी, संगणक परीचालक संदीप मोतीराम दांडगे, दिनकर चंदनसे,सुभाष मिसाळ. गणेश मोठे ,याच्यासह अनेक गावकरी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे