pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

अनोळखी मृत महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

 जालना/प्रतिनिधी, दि. 24

बसस्थानक जालना येथून अनोळखी वृध्द महिला अंदाजे वय 70 वर्ष हीस बेशुध्द अवस्थेत सामान्य रुग्णालय जालना येथे औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतू जिल्हा वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ. कराडकर यांनी अनोळखी महिलेची तपासणी केली असता ती मयत झाल्याचे सांगितले. यावरुन जालना येथील सदर बाजार पोलिस ठाण्यात एमएलसी रिपोर्टवरुन आ.मृ.क्र.11/2023 कलम 174 सीआरपीसी प्रमाणे दाखल करण्यात आले आहे. अनोळखी स्त्रीच्या अंगावर साडी व ब्लाऊज फिकट गुलाबी रंगाचे कपडे आहेत. उंची 5.3 इंच आहे. रंग काळा, नाक सरळ, शरिर बांधा सडपातळ, चेहरा लांबट, केस पांढरे अशा वर्णनाच्या अनोळखी महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक, सदर बाजार, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे